करदात्या मुंबईकरांच्या पैशातून अ‍ॅन्ड्राईड मोबाइल  घेण्यास मनसेच्या दोन नगरसेवकांनी नकार दिला असून तसे पत्रच त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
‘नगरसेवकांची चंगळ.. जे जे फुकट ते ते पौष्टिक’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन मनसे नगरसेवक संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांनी महानगरपालिकेकडून देण्यात येणारा अ‍ॅन्ड्राईड मोबाइल घेण्यास नकार दिला आहे.
मात्र, यासंदर्भात घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणास आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Story img Loader