महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळाचौकी येथील नगरसेविका वैभवी चव्हाण यांना येथील एका फेरीवाल्या महिलेने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. वैभवी सायंकाळी परिसरात फिरत असताना फेरीवाल्या महिलेशी त्यांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसन मारहाण करण्यात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली. वैभवी यांनी मात्र यांनी अशा प्रकारची घटना घडल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
फेरीवाली रस्त्यावर व्यवसायासाठी बसली असता चव्हाण यांनी तिला पदपथावर बसण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्याने दोघींमध्ये वाद झाला.

Story img Loader