MNS Replied To Ambadas Danve : राज ठाकरे हे भाजपाची तळी उचलण्याचं काम करत आहेत. भाजपा ज्याप्रकारे स्क्रीप्ट लिहून देते, त्याप्रमाणे राज ठाकरे बोलतात, अशी बोचरी टीका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली होती. दानवेंच्या या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ”हिंदुत्त्वाच्या गप्पा मारणारे अंबादास दानवे स्वत: संभाजीनगरमधून विधानपरिषदेवर निवडून जातात औरंगजेबाची औलाद असलेल्या ओवैसींच्या जीवावर निवडून जातात”, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – आमदारांना झालेल्या धक्काबुक्कीवरून अजित पवारांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “ती पन्नास खोक्यांची घोषणा…”

“असली-नकली हिंदुत्त्वाच्या गप्पा मारणारे अंबादास दानवे स्वत: संभाजीनगरमधून विधानपरिषदेवर निवडून जाताना औरंगजेबाची औलाद असलेल्या ओवैसींच्या जीवावर निवडून जातात. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तळी उचलून आपला संपूर्ण पक्षच संपवला याची आठवण मला अंबादास दानवे यांना करून द्यायची आहे”, अशी टीका गजानन काळे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, “लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून काहीही बरळू नका, असा विनंती वजा इशारा तुम्हाला देतो आहे. बारामतीचा पोपट अशाप्रकारे विरोधी पक्षनेता म्हणून बोलायला लागला, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही”

हेही वाचा – “आमिष देऊन धर्मपरिवर्तन होत असेल तर…”; नगरमधील धर्मांतर प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नेमकं काय म्हणाले होते अंबादास दानवे?

“राज ठाकरे हे भाजपाची तळी उचलण्याचं काम करत आहेत. भाजपा ज्याप्रकारे स्क्रीप्ट लिहून देते, त्याप्रमाणे राज ठाकरे बोलतात. ईडीच्या नोटीसीनंतर त्यांच्या भूमिकेत कमालीचा बदल झाला आहे. आताचे राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असल्याप्रमाणे भूमिका मांडतात. ज्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना त्यांनी सोडली, आता तेच मी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवतोय, असं भंपक वक्तव्य करतात. खऱ्या अर्थाने ते कधीतरी बोलून महाराष्ट्राचं मनोरंजन करण्याचं काम करतात”, असा खोचक टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला राज ठाकरे यांना लगावला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader gajanan kale replied to ambadas danve on raj thackeray criticized spb
Show comments