पायाचं दुखणं वाढल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हणजेच ३१ मे रोजी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच १ जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गुन्हा दाखल केल्यावर…”; NCP कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवरही केलं भाष्य

याबात टीव्ही ९ मराठीने सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे ही शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी उद्या म्हणजेच ३० मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जातील. त्यांनातर १ जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> “पंकजा मुंडे सर्व जागांसाठी पात्र आहेत”, फडणवीसांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंचा टोला, म्हणाले…

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौरा यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजप खासदाराने राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी या भाजप खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.

Story img Loader