महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेने इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या बसची तोडफोड केली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉल्वो बसच्या व्यवस्थापनाचं काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री या बसची तोडफोड केली. ताज हॉटेलबाहेर असणारी ही बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर या प्रकरणावरुन आता मनसेने थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन आयपीएलमधील आर्थिक हितसंबंधांवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. जर आयपीएलसंदर्भातील कामं स्थानिकांना मिळणार नसतील तर स्पर्धा मुंबईत भरवण्याचा खटाटोप का केला जातोय असा प्रश्न मनसेच्यावतीने देशपांडे यांनी विचारलाय. “महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे की युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वत:च अर्थचक्र फरिवायला घेतलाय की महाराष्ट्रचं?,” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलंय.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

प्रकरण काय?
आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईतील व्यावसायिकांना देण्यात न आल्याबद्दल मनसेने आक्षेप घेतलाय. या संदर्भात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर उभ्या असणाऱ्या आयपीएलच्या खेळाडूंचा प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या बसची तोडफोड केली. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या प्रवासासाठी बस महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या आहेत. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नसल्यानेच मनेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम दिलं जावं अशी मनसेची मागणी आहे.

मनसेचं नेमकं म्हणणं काय?
मनसेचे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणासंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “या प्रकरणी गेल्या आठवड्याभरापासून मी आयपीएशी संबंधित अधिकारी, राज्यातील मंत्री आणि संबंधित सर्व वाहतूक ठेकेदरांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देत, फेसबुकवरुन विनंती केली. आयपीएलच्या आयोजनाची बैठक झाली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी आयपीएलमुळे अर्थचक्र वाढेल, हॉटेल उद्योग तसंच वाहतूक क्षेत्र वाढेल असं कबूल केलं होतं. पण दुर्दैवाने आयपीएलचं सर्व काम दिल्लीमधील कंपन्यांना दिलं गेलं. महाराष्ट्रात तेवढे सक्षम वाहतूकदार आहेत. टेम्पोदेखील दिल्लीतून आणले जात असून ऐकत नसल्याने मनसेने इशारा दिला होता. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे,” असं नाईक म्हणालेत.

कररचनेमुळे बाहेरील गाड्या…
“दिल्लीच्या गाड्यांवर कोणताही कर नाही. त्यांना कोणताही कर भरावा लागत नसल्याने ते कमी टेंडर भरत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकांना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत आहे. आधीच लॉकडाउनमुळे पिचले असताना उद्योगधंदा नाही. पण तरीही मुद्दामून केलं असं म्हणणं योग्य नाही,” असंही नाईक म्हणाले. बसची तोडफोड केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर ‘मनसेचा दणका’ असं पोस्टर चिकटवली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आयपीएल कधीपासून?
‘आयपीएल’च्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे.

Story img Loader