महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलंबित आमदार राम कदम यांना मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. पंतनगरमधील शिधापत्रिका कार्यालयातील अधिकारी महेश पाटील यांना मारहाण केल्याचा गुन्हा कदम यांच्यावर दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना मंगळवारीच विक्रोळीतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
विधानभवनाच्या आवारात पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी राम कदम यांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla ram kadam arrested