मुंबई: वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाअंतर्गत देण्यात आलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता झाल्याशिवाय, तसेच करारनामा झाल्याशिवाय घरे रिकामी करू नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी बीडीडीतील रहिवाशांना केले. राज ठाकरे यांनी शनिवारी वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी म्हाडाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत रहिवाशांना वरील आवाहन केले.

मुंबई मंडळ ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचे काम करीत आहे. मात्र वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामात अनेक त्रुटी आहेत, बीडीडीवासीयांच्या अनेक समस्या आहेत. म्हाडाचे मुंबई मंडळ कामातील त्रुटी दूर करीत नाही, तसेच रहीवाशांच्या समस्याही सोडवत नाही, असे गाऱ्हाणे वरळी बीडीडीतील रहिवाशांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत वरळीतील कामाची पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या राहिवाशांनी आपली गाऱ्हाणी मांडली. मंडळाने कॉर्पस फंड आणि घरभाडे वाढवून द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी यावेळी केली. आपल्या मागण्या न ऐकता केवळ घरे रिकामी करण्यासाठी मंडळाचे अधिकारी नोटिसा पाठवून दबाव टाकत असल्याचा, आरोपही रहिवाशांनी यावेळी केला.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

हेही वाचा… कर्करोग ग्रस्त रुग्णांना घराजवळ उपचार तूर्तास अशक्य; इंडियन कॅन्सर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज गुप्ता

या पुनर्विकासात प्रयेक घरामागे वाहनतळातील एक जागा द्यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे. या मागणीनुसार स्वतंत्र वाहनतळ बांधून देऊ, मात्र यासाठी राहिवाशांना बांधकाम शुल्क द्यावे लागेल, असे म्हाडा प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अद्यापही वाहनतळाचा प्रश्न निकाली लागलेला नाही. दरम्यान, ‘वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय, तसेच राज्य सरकार आणि म्हाडाने दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता झाल्याशिवाय घरे रिकामी करू नका’, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.

कामातील त्रुटी आणि रहिवाशांच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी राज ठाकरे लवकरच म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मनसेचे संतोष धुरी यांनी दिली.

Story img Loader