महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा कऱण्यात आल्याने सध्या चर्चांना उधाण आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट केला जायचा हे तर आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण आता राज ठाकरेंचाही उल्लेख तशा पद्धतीने करण्यात आल्याने चर्चा रंगली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी याआधी आपला उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा केला जाऊ नये असं कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. त्यामुळे या बॅनरवर ते काय बोलतात हे पहावं लागेल.

मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका – राज ठाकरे

हिंदू जननायक म्हणू नका – राज ठाकरे

घाटकोपरमध्ये राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. यासाठी राज ठाकरेंचे मोठे बॅनर्स परिसरात लावण्यात आले आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे मोठे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

याअगोदर ठाण्यात राज ठाकरेंचा हिंदूह्रदयसम्राट उल्लेख करणारे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका असं खडसावलं होतं.

“मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका”

राज ठाकरे यांनी याआधी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली होती. २७ जानेवारी २०२०२ ला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

पक्षाचं पहिलं महाअधिवेशन पार पडल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ही सूचना केली होती.