लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराच्या निमित्ताने लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रचाराला कधी सुरूवात होणार याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. मनसेच्या लोकसभा निवडणूक लढविण्यापासून ते पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करण्यापर्यंत राज ठाकरे नेहमीच आस्ते कदम पाऊले उचलत होते. त्यानंतर मराठी नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार येत्या ३१ तारखेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची पहिली सभा पुण्यात होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभांचा तपशील पुढीलप्रमाणे:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा