अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केलेल्या कामांवर मतं न मागता ठाकरे गटाकडून केवळ सहानुभूतीचे राजकारण केले जात आहे. तसेच जाणीवपूर्वक मराठी गुजराती असा वाद निर्माण केल्या जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…” म्हणत आदित्य ठाकरेंनी घेतला वक्तव्याचा समाचार

नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?

“आज विविध माध्यमं आणि समाजमाध्यमांना हाताशी धरून केवळ सहानुभूतीचं राजकारण केल्या जात आहे. मात्र, उद्धव ठाकरेंना सहानुभूती नेमकी का द्यायची? तुमचे आमदार फुटले म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की, कोरोना काळात मराठी माणसाला लोकलमध्ये चढू न देणे, महापौरांच्या मुलाला दिलेली कंत्राट, त्यावेळी झालेला भ्रष्टाचार, या मुद्यांवर तुम्हाला सहानुभूती द्यायची? हा प्रश्न मराठी माणसांना पडला आहे”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

“अंधेरी पोटनिवडणुकीत तुम्ही कामं दाखवून मत मागायला हवीत. मात्र, आज तुम्ही केवळ आमदार फोडले म्हणून सहानुभूतीचं राजकारण करत आहात. तुम्हाला वाईट दिवस आले म्हणजे मराठी माणसांनी तुम्हाला सहानुभूती द्यायची, असा काही नियम तुम्ही केला आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

हेही वाचा – मनसे आणि भाजपाची युती? आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल, चर्चांना उधाण

“अंधेरी पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे मराठी जनता ठरवेल. सध्या अंधेरीत मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जेव्हा वरळीत आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे होते, तेव्हा ‘केमछो वरळी’ असे पोस्टर लावण्यात आले होते. केवळ स्वताच्या सोयीप्रमाणे मराठी-गुजराती वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sandeep deshpande criticized uddhav thakeray on andheri bypoll spb