आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. भाजपा नेते राज ठाकरेंची भेट घेत असल्याने ही वाढती जवळीक पाहता लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त होती होती. पण यादरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

संदीप देशपांडे यांना मनसेच्या बैठकीसंबंधी विचारण्यात आलं. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिंदे गटासोबत युती करणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “ही पक्षाची अंतर्गत विषयासंबंधी बैठक होती. तिथे काय चर्चा झाली हे माध्यमांसमोर सांगू शकत नाही. शिंदे गटासोबत युती करण्यासंबंधीच्या बातम्या आम्हीही पाहत आहोत. पण राज ठाकरेंच्या आदेशानुसार मुंबई, नवी मुंबई, संभाजीनगर किंवा इतर महापालिकांच्या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व जागा लढवण्याची तयारी करत आहेत”.

Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

शिंदे गट-मनसे युतीच्या दिशेने; मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपचे छुपे सहकार्य

शिंदे गट किंवा भाजपासोबत युती करण्यासंबंधी विचारलं असता संदीप देशपांडेनी सध्या राज ठाकरेंनी सर्व जागा लढवण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचा पुनरुच्चार केला. “आमच्या पक्षाचे निर्णय राज ठाकरे घेतात, भाजपा घेत नाही. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार सर्व जागा लढवण्याची तयारी सर्व पदाधिकारी, शाखा अध्यक्ष करत आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले “याआधीही २०० ते २२७ दरम्यान जागा लढवल्या होत्या. २००६, २०१२, २०१७ मध्ये आम्ही सर्व ताकदीने सर्व जागा लढवल्या होत्या. त्याचप्रमाणे यावेळीही २२७ जागा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहोत. तशी तयारी सुरु असून राज ठाकरेंकडून वेळोवेळी आदेश येत आहेत”.

भाजपाचा मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव असून, त्यांनी मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाटय़ातील जागा द्याव्यात, असा भाजपाचा विचार आहे. न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजतं.

भाजपा नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत. मात्र, मनसेशी थेट युती करण्याची भाजपाची तयारी नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ नये आणि शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी मनसेचा वापर करावा, अशी भाजपची रणनीती आहे.

भाजपाने शिंदे गटाबरोबर युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केलं आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळते का आणि शिवसेनेतील किती नगरसेवक शिंदे गटाकडे येणार, यावर किती जागा सोडायच्या, याविषयी निर्णय होईल. मनसेशी वेगळी युती करून त्यांना जागा सोडणे भाजपाला शक्य नसल्याने छुप्या सहकार्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाशी युती म्हणून त्यांना ८०-९० जागा सोडायच्या आणि प्रभागांमधील ताकदीनुसार शिंदे गटाने त्यामधून मनसेच्या उमेदवारांसाठी जागा सोडायच्या, असे तूर्त ठरविण्यात आलं आहे. मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपा त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत. मनसे जिथे निवडून येऊ शकते, त्या जागांवर भाजपा उमेदवार देणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्याचे समजतं.