पुण्यात झालेल्या मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी संजय राऊतांची नक्कल केली होती. त्यावर संजय राऊतांनी “आमचं राजकारण नकलांवर चालत नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा राज ठाकरेंनी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनात संजय राऊतांना टोला लगावला. एकंदरीतच मनसे आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं दिसून येतंय. अशातच मनसेचे संदीप देशपांडे यांची फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संजय राऊतांनी आता एकांतात…”, राज ठाकरेंचा खोचक सल्ला; नकलांबाबत मारलेल्या टोमण्यावर दिलं प्रत्युत्तर!

जेल मध्ये गेल्यावर काही लोक घरचं जेवण मागतात, काहींना पुस्तकं लागतात, काहींना औषध लागतात. मात्र, यापुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असा टोला संदीप देशपांडे यांनी फेसबूक पोस्ट करत लगावला आहे. त्यामुळे हा टोमणा नेमका कुणासाठी अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांतील राज्यातील राजकारण आणि टोमण्यांना प्रत्युत्तर पाहिलं असता देशपांडेंनी हा टोला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना लगावला असल्याची चर्चा सुरू आहेत.

हा टोला संजय राऊत यांच्यासाठीच असल्याची चर्चा रंगण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पत्रकार परिषद. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. तसेच रोज सकाळी ते न चुकता माध्यमांशी संवाद साधतात. त्यामुळे संदीप देशपांडे यांचा रोख संजय राऊतांच्या दिशेने असल्याचा तर्क लावला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sandip deshpande facebook post taunts sanjay raut over press conference hrc