मुंबई, ठाणे : शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रस्थापित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडून रसद मिळावी, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचे समजत़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होतो. यंदाही मेळाव्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. परंतु, मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. गणेशोत्सवानंतर निर्णय घेतला जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा वाद सुरू असतानाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्वाळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. महापालिकेकडून परवानगीसाठी चालढकल करण्यात येत असल्याने ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात विघ्न येणार, हे स्पष्ट झाले. त्यानंतर शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेला आव्हान देऊन दसरा मेळावा घ्यायचा, तर त्यासाठी मुंबईत एकटय़ा शिंदे गटाची ताकद पुरणार नाही़ यामुळे दसरा मेळाव्यासाठी समविचारी नेते, पक्षांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत घेण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने चाचपणी सुरू केली आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होईल, असे विधान केले आहे. शिंदे यांनी बोलावले तर मी मेळाव्याला जाईन, असेही राणे यांनी म्हटले आहे. त्याचवेळी गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.
‘‘ही भेट गणेश दर्शनासाठी होती. पण, राज यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यातही राजकीय सहकार्य केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला कोणाकोणाला बोलावण्यात येईल, हे आताच सांगता येणार नाही. गणेशोत्सवानंतर याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थळही त्याच वेळी अंतिम होईल’’, असे शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे-ठाकरे भेटीनंतर सांगितले. त्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट इतरांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय रसद मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या आधी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळावा घेण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आपणच आहोत व आपणच शिवसेना असल्याने दसरा मेळावा घेण्याचा विचार त्यांनी मांडला. तसेच यासाठी तयारीला लागण्याचा आदेश सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांना दिला. गणेशोत्सव संपल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करतील, असेही त्यावेळी ठरले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतल़े त्यानंतर उभय नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या.
शिवसेनेचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर घेण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील.
– नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिंदे गट
एक नेता, एक पक्ष, एक मैदान, एक विचार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळाव्याचा वारसा असून, तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थपणे चालवत आहेत. सत्ता आली म्हणून काहीही करून त्रास देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे.
– किशोरी पेडणेकर, माजी महापौर, शिवसेना