सक्तवसुली संचालनालयाने मालमत्तेवर टाच आणल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपावर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतच्या आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा करून पीएमसी बँकेच्या माध्यमातून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ते पैसे स्वत:कडे वळवले, असा आरोप राऊत यांनी गुरुवारी केला. शिवसैनिकांनी राऊत यांचे जंगी स्वागत केलं. मात्र याच जंगी स्वागतावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट अपशब्द वापरत संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”

राऊत यांच्या स्वागताला शेकडो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच त्यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलं. मात्र राऊत यांच्या या स्वागतावरुन संदीप देशपांडेंनी थेट अपशब्दाचा वापर करत राऊत यांनी संपत्ती जप्त झाल्यानंतर जंगी सोहळा केल्याचा खोचक टोला लगावलाय.

नक्की वाचा >> शिवसैनिकांनी केलेलं राऊतांचं जंगी स्वागत पाहून नारायण राणे संतापले; म्हणाले, “राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की…”

संदीप देशपांडे यांनी सकाळी सातच्या आसपास केलेल्या ट्विटमध्ये, “स्वत:वर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ११ कोटींची संपत्ती जप्त झाली म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड** पहिल्यांदाच बघितले,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…”

राऊतांनी काही दिवसांपूर्वीच सोमय्यांसाठी वापरलेले अपशब्द
काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्यांबद्दल बोलताना अपशब्द वापरलेले. आयएनएस विक्रांतसंदर्भात सोमय्या यांनी केलेल्या ५७ लाखांच्या कथित घोटाळा प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केल्यानंतर सोमय्यांनी राऊतांना उत्तर देताना संजय राऊतांचा हा नवीन पराक्रम असल्याचं वक्तव्य केलं होतं.

नक्की वाचा >> शिवसैनिकांनी केलेलं राऊतांचं जंगी स्वागत पाहून नारायण राणे संतापले; म्हणाले, “राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की…”

याचसंदर्भात राऊतांना पत्रकार परिषदेत विचालं असता त्यांनी येड** असा आक्षेपार्ह शब्द वापरला. “येड** आहे तो, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. महाराष्ट्रात अशा चु** लोकांना स्थान नाही. महाराष्ट्राला लागलेली ही कीड असून ही कीड संजय राऊत, शिवसेना संपवणार. हा चु** पराक्रम काय सांगतो मला,” अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला होता.

Story img Loader