गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द टी जंक्शन परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून अनेक वेळा तक्रार केल्यानंतरही हे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या वाहतूक सेनेने गुरुवारी या खड्यांमध्ये मासे आणि खेळण्यातील होड्या सोडून अनोखे आंदोलन केले.

हेही वाचा >>> महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, घराबाहेर न पडण्याचा इशारा

मानखुर्द – घाटकोपर आणि शीव – पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या मानखुर्द टी जंक्शन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. परिणामी, येते दररोजच वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच खड्यांमधील खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकीच्या अपघातांची संख्या वाढली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र महानगरपालिकेने आद्यपही येथील खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष माऊली थोरवे यांनी कार्यकर्त्यांसह येथील खड्यांमध्ये मासे आणि खेळण्यातील होड्या सोडून अनोखे आंदोलन केले. तसेच येत्या आठ दिवसात राज्यांतील खड्यांचा प्रश्न सोडविण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Story img Loader