मुंबईः पुण्यातील ससून रुग्णालयातून आरोपी ललित पाटील पळाल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत सुमारे ३७०० कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अटकेत असलेले कॉक्स अॅन्ड किंग्स कंपनीचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर यांच्याकडे रुग्णालयात मोबाईल फोन व टॅब सापडला आहे. केरकर दक्षिण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत होते. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार घडला, त्यावेळी त्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही तैनात होते.

हेही वाचा >>> मुंबई : कूपर रुग्णालयामध्ये पोलिओ आणि पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

उच्च न्यायालयाचा आदेशानुसार गेल्या चाडेचार महिन्या पासून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेले कॉक्स अँड किंग्जचे प्रवर्तक केरकर यांच्याकडून मोबाइल फोन, टॅब व चार्जर जप्त करण्यात आला आहे. केरकरला २०२० मध्ये आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती पाहता त्याला बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक शस्त्रागार कक्षाचे पोलीस दिवस-रात्र दोन पाळ्यांमध्ये तैनात असायचे. मग मोबाईल संच आणि टॅब त्याच्यापर्यंत कसा पोहोचला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा >>> दुरूस्तीच्या नावाखाली स्वातंत्र्यपूर्व काळातील इमारतीवर आठ बेकायदा मजले, इकॉनॉमिक हाऊसचे बेकायदा मजले तातडीने पाडा

सुमारे चार महिन्यांपासून केरकर हा बॉम्बे उपचार घेत आहे. विविध आजारांवर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र तो किती दिवसापासून मोबाईल फोन वापरतो, याबाबत तपास सुरू आहे. आर्थर रोड तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली आणि त्याच्याकडून आरोपीच्या ताब्यात मोबाईल, टॅब व चार्जर सापडला. त्यानंतर याप्रकरणी तात्काळ स्थानिक आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अजय अजित पीटर केलकर यांच्यावर सक्तवसुली संचलनालय(ईडी) व मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत अनेक गुन्हे दाखल आहे. ईडी केरकर संबंधीत किमान १० प्रकरणामध्ये तपास करत आहे. बँकांकडून कर्ज घेऊन त्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केरकर यांच्यावर आहे. मे. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि,एम एस फायनान्स कर्ल ऑन इंटरप्रायजेस लि., येस बँक, लक्ष्मी विलास बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सीस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक व खासगी गुंतवणूकदार कंपनी यांनी आरोपीच्या कंपनीविरोधात तक्रार केली होत्या. आरोपी कंपनीने सुमारे तीन हजार ७०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. कॉक्स अँड किंग्सचे पीटर केरकर यांच्याही तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.