शीळ येथील लकी कंपाऊंडमधील आदर्श इमारतींच्या आर्थिक व्यवहारात मोठय़ा प्रमाणात मोबाइलचा वापर झाला आहे तसेच एसएमएसद्वारे सांकेतिक भाषेचा वापरही करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात सादर केली. विशेष म्हणजे, आपण कोणत्याही कायदेशीर कचाटय़ात अडकू नये, यासाठी महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण हे दलाल सय्यद जब्बार पटेल याच्या नावाचे सिमकार्ड या इमारतींच्या अर्थिक देवाण-घेवाणीसाठी वापरत होते, अशी माहितीही पोलीस तपासात उघड झाली असून या संबंधीचे पुरावेही न्यायालयात या वेळी सादर करण्यात आले.

Story img Loader