केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला नियंत्रित करण्यासाठी व रोखण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यामध्ये करोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था आणि रुग्णालयस ज्ज आहे याची पडताळणी करण्यात येणार आहे. या मॉक ड्रिलमध्ये औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, वैद्यकीय साधने, वैद्यकीय प्राणवायू, मनुष्यबळ आणि लसीकरणाची व्याप्ती याची तपासणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>“अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करणाऱ्यांच्या तोंडात राम अन्…”; ठाकरे गटाचा शिंदे गट-भाजपावर हल्लाबोल!
फेब्रुवारीच्या मध्यापासून देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लसीकरणामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली नसली तरी करोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने १० आणि ११ एप्रिलला आरोग्य व्यवस्थेची सज्जता तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. यामध्ये औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, वैद्यकीय साधने, वैद्यकीय प्राणवायू, मनुष्यबळ आणि लसीकरणाची व्याप्ती याची माहिती घेण्यात येणार आहे. मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या आढाव्यानुसार महानगरपालिकेची सर्व रुग्णालये करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच राज्यातील सर्व रुग्णालय प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.घेण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत.