आधीच वेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या स्वयंघोषित गुरू राधे माँ यांच्यावर मॉडेल अर्शी खान हिने नवा आरोप लावला आहे. राधे माँ यांच्या व्यावसायिक भागीदारांनी आपल्याकडे सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्याची विचारणा केली होती, असा गंभीर आरोप अर्शी खान हिने वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला. दरम्यान, यासंदर्भात तिने अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.
अर्शी खान म्हणाली, सात-आठ महिन्यांपूर्वी मी राधे माँना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे त्यांचे काही व्यावसायिक भागीदारही उपस्थित होते. त्यांच्यापैकी काहींनी आपल्याकडे सेक्स करण्याची मागणी केली. या व्यावसायिक भागीदारांसोबत सेक्स केल्यास त्यामुळे तुम्हाला खूप पैसा मिळेल, असेही आमिष आपल्याला दाखवण्यात आले, असे तिने सांगितले. आपण ही ऑफर थेटपणे फेटाळली होती. मात्र, राधे माँचे नाव मोठे असल्यामुळे आणि त्या खूप प्रसिद्ध असल्यामुळे त्यावेळी मला या विरोधात पोलीसांकडे तक्रार करावी, असे वाटले नव्हते, असे अर्शी खान हिने सांगितले.
एका भोजपुरी चित्रपटात निर्मात्याच्या कानशिलात लगावल्यामुळे अर्शी खान हे नाव याआधी चर्चेत आले होते. दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेत्री डॉली बिंद्रा हिने यापूर्वी राधे मॉंवर अश्लील व्हिडिओ दाखवण्याचे आरोप केले आहेत. मात्र, हे सर्व आरोप राधे माँने फेटाळले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा