भारतीय जनता पक्षाचे(भाजप) उमेदवार नरेंद्र मोदींच्या ‘आधी शौचालये, नंतर देवालये’ या धाडसी वक्तव्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता भाजप मोदींच्या विचारांशी सहमत नसल्याचे दिसत आहे. असे शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून म्हटले आहे.
याआधी जयराम रमेश यांनीही अशाच प्रकारची धाडसी प्रतिक्रिया दिली होती. यावर मोदींनी जय ‘श्रीराम’ ऐवजी ‘जयराम’ म्हटले त्यामुळे भाजपची धावपळ झाली असेही शिवसेनेने म्हटले आहे.
“सध्याचे चित्र पाहता मोदी पुढे आणि भाजप मागे असल्याचे चित्र आहे. यावर आता आम्ही काय बोलणार? यातून इतकेच की मोदी काय भुमिका घेतात हे भाजपलाही माहित नाही.” असेही सामनामध्ये नमूद करुन शिवसेनेने भाजप आणि मोदींमध्ये ताळमेळ नसल्याचे वक्तव्य केले आहे.

Story img Loader