भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्यावर गंभीर आरोप केले. मोहित कम्बोज हे देवेंद्र फडणवीसांचे फ्रंन्ट मॅन आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक फ्रंटमॅन आहे मोहित कम्बोज. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे. पत्राचाळची जमीन खरेदी करणारे मोहित कम्बोज आहेत. त्यामध्येही पीएमसी बॅंकेचे पैसे लावलेले आहेत. पत्राचाळीमध्ये पीएमसी बॅंकेच्या गैरव्यवहारातील पैसे लावण्यात आले आहेत. तिथे मोहित कम्बोजचे एक बांधकाम सुरु आहे आणि आमच्याकडे बोट दाखवले जात आहे. राकेश वाधवानकडून मोहित कम्बोजच्या केबीजी ग्रुपने १२ हजार कोटी रुपयांची जागा फक्त १०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

What Devendra Fadnavis Said About Brahmin Cast
Devendra Fadnavis : ‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
After threat to UP CM Yogi Adityanath Mumbai Police received another threat message
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Mallikarjun Kharge marathi news
Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाजपावर आणि ईडीवर आरोप केले आहेत., ईडीनं त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईविषयी संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. . ईडीनं मुलीच्या लग्नाच्या चौकशीत मेहंदीवाल्याला देखील सोडलं नाही, टेलरकडेही जाऊन चौकशी केली, असं राऊत यावेळी म्हणाले.

“सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहे असे त्यांनी मला सांगितले. त्यांचे प्रकरण सुद्धा सोपे नाही आम्ही त्यांनासुद्धा टाईट करु. मी माहिती घेतल्यानंतर शरद पवारांच्या कुटुंबियांवर सातत्याने धाडी पडू लागल्या. ईडीचे लोक त्यांच्या मुलींच्या बहिणीच्या घरात आठ दिवस ठाण मांडून बसले होते आणि तिथेही त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. मी त्यांना आम्ही प्रतिकार करु असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला आम्ही केंद्रीय पोलीस बल आणून सगळ्यांना थंड करु असे म्हटले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली. धाड पडण्याआधी तो मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना अटक होणार आहे असे सांगतो. ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत असे सांगतो. हा काय प्रकार आहे?,” असे संजय राऊत म्हणाले.

“मी म्हटलं सरकार पडू देणार नाही, तेव्हा माझ्या मागे लागले. त्यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत. माझ्या बँकेत ईडीची लोकं गेल्याचं मला समजलं. माझे २० वर्षांचे बँकेचे स्टेटमेंट घेऊन गेले. माझं गाव अलिबाग. माझी जमीन अलिबागलाच असेल. ते मॉरिशसला नसेल. भाजपाच्या नेत्यांप्रमाणे लंडन-अमेरिकेत माझ्या मालमत्ता नसतील. ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. त्यासाठी किहीम गावातल्या नातेवाईकांच्या घरी पहाटे ४ वाजता जाऊन त्यांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयात नेऊन ठेवायचं. तू संजय राऊतांच्या विरोधात साक्ष दे की त्यांनी तुला किती पैसे दिले. धमक्या द्यायचं काम ईडी करत आहे. कोणत्या कायद्यानं?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.