भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या तीन ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच त्यांनी बुधवारी रात्री अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं. अन्य एक ट्वीट करत त्यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता हे स्पष्टच आहे. या घोटाळ्यावरुन चर्चा सुरु झाली असतानाच काल रात्री ते फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेल्याने नेमकी ही भेट कशासाठी अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र या भेटीमागील कारणाचा खुलासा कंबोज यांनीच केला आहे.
नक्की वाचा >> ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा