शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यानंतर आज (१६ फेब्रुवारी) त्यांनी पुन्हा ट्वीट करत बाप बेटे जेलमध्ये जाणार असल्याचं म्हटलं. यानंतर भाजपा नेते मोहित कुंबोज यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच सलीम-जावेद दोघंही तुरुंगात जाणार असल्याचा इशारा दिला.

मोहित कुंबोज म्हणाले, “सलीम आणि जावेद दोघंही तुरुंगात जाणार आहेत. थांबा आणि वाट पाहा.”

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

मोहित कुंबोज यांनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर देखील पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यात त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख जावेद असा, तर नवाब मलीक यांचा उल्लेख सलीम असा केला.

“संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली”

भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी संजय राऊत मला ओळखतात आणि त्यांना मी अनेकवेळा आर्थिक मदत केली आहे, असे म्हटले आहे. ते म्हणाले, “सलीम-जावेदमधल्या जावेदने पत्रकार परिषद घेऊन आरोप लावले आहेत. ६० मिनिटांच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नवाब मलिकांनी गेल्या ५ महिन्यांपासून सुरू केलेली गोष्ट पुढे नेली आहे. संजय राऊत पंतप्रधान मोदींपासून सुरू होऊन देवेंद्र फडणवीसांपर्यंत बोलतात.”

“गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र सरकार माझ्याविरुद्ध जिंकू शकत नाही. पोलिसांचा दबाव आणि ट्विटरच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत. पण नवाब मलिकांनाही दोनदा न्यायालयात जाऊन जामीन घ्यावा लागला. हे लोक स्वतः अडकतात तेव्हा खोटी आरोप घेऊन समोर येतात,” असे मोहित कम्बोज म्हणाले.

मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे : संजय राऊत

संजय राऊत यांनी भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्यावर गंभीर आरोप केले. मोहित कम्बोज हे देवेंद्र फडणवीसांचे फ्रंन्ट मॅन असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक फ्रंटमॅन आहे मोहित कम्बोज. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे. पत्राचाळची जमीन खरेदी करणारे मोहित कम्बोज आहेत. त्यामध्येही पीएमसी बॅंकेचे पैसे लावलेले आहेत.”

हेही वाचा : “संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली”; मोहित कम्बोज यांचा दावा

“पत्राचाळीमध्ये पीएमसी बॅंकेच्या गैरव्यवहारातील पैसे लावण्यात आले आहेत. तिथे मोहित कम्बोजचे एक बांधकाम सुरु आहे आणि आमच्याकडे बोट दाखवले जात आहे. राकेश वाधवानकडून मोहित कम्बोजच्या केबीजी ग्रुपने १२ हजार कोटी रुपयांची जागा फक्त १०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Story img Loader