कांदिवली पूर्व पोईसर येथे एका ६ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याच भागात राहणाऱ्या बाबूलाल पटेल (५२) याला याप्रकरणी अटक केली आहे.
 बुधवारी सकाळी ही मुलगी पटेल याच्या घराजवळ खेळत होती. ११ च्या सुमारास पटेल याने या मुलीला आपल्या घरात नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले. घरी आल्यावर मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला.
या पीडित मुलीवर भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पटेल बेरोजगार असून आपल्या मुलासह तो या ठिकाणी राहतो. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २० हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.   

Story img Loader