बसचालकाला अटक
मोबाइलमध्ये गाणी दाखवण्याच्या बहाण्याने स्कूल बसमध्ये पाच वर्षांच्या शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या २५ वर्षीय बसचालकास अटक करण्यात आली आहे.
नूर मोहम्मद शाहबाज शेख (२५) हा स्कूल बसचा चालक आहे. मोबाइलमध्ये गाणी दाखवण्याच्या निमित्ताने तो एका पाच वर्षीय विद्यार्थिनीला आपल्या शेजारी बसवून घ्यायचा. गेले आठवडाभर तो याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग करत होता. गाडीत चालकाच्या शेजारी बसण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा असते. त्यामुळे आधी कोणालाच शंका आली नाही. पण चालकाच्या वर्तनामुळे ती घाबरली आणि घरात उदास राहत होती.
शाळेला जाण्याची वेळ आली की ती टाळाटाळ करू लागली. तिच्या पालकांनी चौकशी केल्यावर तिने सारा प्रकार सांगितला. पालकांच्या तक्रारीनंतर यानंतर शेख यास अटक करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले. शेख यास २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा