डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागातील एका तरुणाने एका तीन वर्षांच्या मुलीचा आपल्या घरात नेऊन विनयभंग केला. बुधवारी आईने विष्णुनगर
पोलीस ठाण्यात तक्रार केली असून विश्वास विश्वनाथ सावंत (वय ३०) या आरोपी तरुणाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी
ही माहिती दिली.
मोठागावमध्ये सावंत व मुलीचे कुटुंब शेजारी राहतात. बुधवारी दुपारी मुलगी खेळताना गायब झाली असल्याचे मुलीच्या आईच्या निदर्शनास आले. विश्वासने
तिला खाऊ देण्याचे निमित्त करून घरात नेले होते. सावंतने या चिमुरडीबरोबर अश्लील वर्तन केले असल्याचे आईच्या निदर्शनास आल्यावर तीने पोलीसांत तक्रार
केली.

Story img Loader