मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात आरोपी असलेले त्यांचे सुपुत्र सलील हे मंगळवारी विशेष न्यायालयासमोर हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात आरोपपत्र दाखल केल्यानंतर विशेष न्यायालयाने सलील यांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सलील हे मंगळवारी विशेष न्यायालयासमोर हजर झाले. त्यानंतर त्यांनी वकील अनिकेत निकम यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. तसेच त्यांची उपस्थिती ग्राह्य धरून त्यांना जामीन मंजूर करण्याची विनंती केली. न्यायालयानेही त्यांचा अर्ज मान्य केला.

Human life, High Court, compensation, mumbai,
तुटपुंजी भरपाई देण्याएवढा माणसाचा जीव स्वस्त नाही – उच्च न्यायालय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड

हेही वाचा >>>‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

सलील यांनी त्यांच्या जामिनासाठीच्या अर्जात त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा केला होता. आपण याप्रकरणी ईडीला संपूर्ण सहकार्य केले आहे. ईडीनेही आपल्याला या प्रकरणी अटक केलेली नाही, असा दावाही सलील यांनी जामिनाची मागणी करताना केला होता.  दुसरीकडे, सलील यांना दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. न्यायालयानेही त्यांना फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले होते. त्यानंतर सलील आता न्यायालयासमोर हजर होत आहेत, असा दावा करून सलील यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला. सलील यांना तपास यंत्रणा तसेच न्यायालयाच्या आदेशाबद्दलही आदर नाही. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ नये, अशी मागणी ईडीतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. आपल्या वडिलांविरोधात विशेष कायद्यांतर्गत दाखल प्रकरण हे त्यांच्या कथित कृत्यापुरते सीमित आहे. परंतु विशेष कायद्यांतर्गत मोडणारा कोणताही आरोप आपल्यावर नाही, असा दावा सलील यांनी केला होता. या प्रकरणी अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून सर्वोच्च न्यायालयानेही तो कायम केल्याचे सलील यांनी अर्जात म्हटले होते.

Story img Loader