वडाळा डेपो ते चेंबूरदरम्यान धावणाऱ्या मोनोरेलच्या फेऱ्यांमध्ये उद्या, मंगळवारपासून वाढ करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मोने मुंबईकरांच्या सेवेत असेल. दिवसभरात मोनोरेलच्या ११२ फेऱ्या होतील. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना सेवा देणे सुलभ होणार असल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले.
सध्या मोनोची सेवा सकाळी सात ते दुपारी तीन याचदरम्यान असते. त्यामुळे सायंकाळी गर्दीच्या वेळी तिचा उपयोग होत नव्हता. त्यामुळेच मोनोचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. चेंबूर आणि वडाळा येथून सकाळी सहा वाजता मोनो पहिली फेरी सुरू करेल. तसेच संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ११२ फेऱ्या मारेल. मोनोरेलच्या बदललेल्या वेळेमुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांना तिचा फायदा होईल, असे एमएमआरडीएचे सह-प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा