राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंगळवारी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेली एक कविता चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा उल्लेख असणारी ही कविता ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून काहींनी तर यावरुन वेगळे तर्कवितर्क लाढवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंची ही कविता पूर्ण करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “मी पक्षप्रमुख असतो तर…”; लांबत चाललेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांचं विधान

सरकारकडून काही त्रुटी राहिल्यास त्या नजरेस आणून द्या. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण आणाल तर माझ्याकडेही तुमच्या चिठ्ठ्या-चपाट्या आहेत. त्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका आणि माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी विरोधकांना गर्भित इशारा दिला. एवढे बोलूनही हा ‘इशारा’ नाही, असा दावाही त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विरोधकांच्या घोषणाबाजीत आघाडीवर राहणाऱ्या धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही विरोधकांनी आज पुन्हा एकदा सरकारविरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : ‘महायुतीला किती जागा मिळतील?’ एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही…”

नक्की वाचा >> “खरं तर लग्न झाल्या झाल्या…”; दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन राज ठाकरेंचा शिंदे सरकारला मिश्कील टोला; सभागृहात पिकला हशा

या घोषणाबाजीमुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना गर्भित इशारा देताना तुमच्या सोबत काम केले आहे, याची आठवण करून देत आपल्याकडे सगळ्या चिठ्ठ्या-चपाट्या आहेत याकडे लक्ष वेधले. बदनामीचे राजकारण थांबवा. सत्ताधारी आणि विरोधक ही एकाच रथाची दोन चाके आहेत. काम करीत असताना सरकारकडून काही त्रृटी राहिल्यास त्या नजरेस आणून द्या. आम्ही संवेदनशील आहोत. त्रुटी दूर करू, परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारम्ण आणून टीका करण्यात वेळ घालवू नका. मला कामातून उत्तर द्यायचे आहे. पण सहन करण्यालाही काही मर्यादा असते, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावले.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “मात्र त्यावेळेस जनता…”; सत्तासंघर्ष घटनापीठाकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आपलं म्हणणं मांडल्यानंतर शिंदे यांनी एक कविताही सादर केली. आठ ओळींच्या या कवितेमध्ये शेवटच्या दोन ओळींमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा उल्लेख असल्याने पहिल्या सहा ओळी म्हटल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे थोडं थांबले. त्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे पाहून, “हे नको ना?” असं विचारलं. त्यावर शिंदेंच्या मागील बाकावर बसलेल्या एका आमदाराने, “वाचा… वाचा” असं म्हटलं. दरम्यान शिंदे शेवटची ओळ वाचावी की नाही याचा विचार करत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी कवितेची शेवटी ओळ म्हटली आणि सभागृहामध्ये अनेकांना हसू अनावर झालं. शिंदेंनी सादर केलेली आणि फडणवीसांनी शेवटच्या दोन ओळी म्हणून पूर्ण केलेली कविता खालीलप्रमाणे…

किती संकटं येऊ द्या
आपण सर्व एकत्र येऊ या…

कशाला करायचे राजकारण
आपला उद्देश समाजकारण

एकमेकांना सहाय्य करुया
महाराष्ट्राला पुढे नेऊया

थांबवा आता शब्दांचे वार
आमचे मित्र अजित पवार

ही कविता सादर करुन झाल्यानंतर एकनाथ शिंदे नमस्कार करुन आपल्या आसनावर बसले. यापूर्वीही विशेष अधिवेशनामध्ये शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आपलं पहिलं भाषण करताना महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांवर टीका केली. मात्र अजित पवार यांनी कायमच आपल्याला सहकार्य केल्याचं म्हटलं होतं.