लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत शनिवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

mumbai city expects light drizzle
मुंबईत शनिवारी हलक्या सरी; राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Mumbai Municipal administration, Mumbai Rain,
मुंबई : पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय
Heavy rain Mumbai, rain Mumbai, Mumbai latest news,
मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज
Mumbai, block on Western Railway, mega-block,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
thane creek bridge 3 mumbai pune traffic latest marathi news
विश्लेषण: तिसऱ्या ठाणे खाडी पुलामुळे मुंबई-पुणे वाहतूक सुरळीत होणार… प्रकल्प सेवेत कधी?
Entry ban for heavy vehicles in Mumbai including Thane and Navi Mumbai
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
weather Department warning to some districts of heavy rain Today September 6
नागपूर : परतीच्या पावसाचा मुक्काम लांबण्याची शक्यता ?

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला. मात्र त्याने काही काळ विश्रांती घेतली होती. मागील दोन दिवसांपासून शहर आणि उपनगरांत पावसाची रिपरिप सुरू झाली असून उपनगरांत पावसाचा जोर वाढू लागला आहे. शहरात शनिवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला असून दुपारी दोन वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईत गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच शहरात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आणखी वाचा-अश्वजित गायकवाड यांच्या विरोधातील हल्ल्याच्या आरोपाचे प्रकरण : तपासातील दिरंगाईवर न्यायालयाचे ताशेरे

यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. मुंबई आणि उपनगरांत बुधवारपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.