पुरुषांच्या मृत्यूमध्ये अधिक वाढ; पालिकेकडून अभ्यास

मुंबई : मुंबईत २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी सुमारे १३ टक्क्यांनी अधिक मृत्यू झाल्याचे आढळले आहे. यात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूंमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असून २०२० मध्ये झालेल्या मृत्यूंपैकी सुमारे १० टक्के मृत्यू हे करोनाबाधितांचे आहेत. मृतांच्या वाढत्या संख्येचा शोध घेण्यासाठी पालिकेनेही अभ्यास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोनाची साथ मार्च २०२० पासून शहरात सुरू झाली. मार्च ते डिसेंबर २०२० या काळात मुंबईत ११ हजार ११६ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरीत्या पालिकेच्या आकडेवारीत जाहीर केले आहे. परंतु २०२० मध्ये एकूण १ लाख ११ हजार ९९१ मृत्यूंची नोंद आहे. हे प्रमाण २०१९ मध्ये ९८ हजार ६४४, तर २०१८ मध्ये ८९ हजार ५४६ इतके  होते.

‘२०१८ आणि २०१९ च्या तुलनेत २०२० आणि २०२१ मध्ये मृतांची संख्या नक्कीच वाढली आहे. यातील सुमारे १० हजार मृत्यू करोनाचे असले तरी उर्वरित मृत्यू करोनाव्यतिरिक्त असल्याची नोंद आहे. मृतांची संख्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाढली याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे,’ असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

मृतांची संख्या गेल्या आणि या वर्षी वाढली असून मृत्यूची कारणे नेमकी कोणती आहेत याचा विश्लेषणात्मक अभ्यास पालिकेने सुरू केला आहे. करोनाव्यतिरिक्त झालेल्या मृत्यूंच्या प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या कारणांवरून कशामुळे मृत्यू वाढले आहेत याची माहिती घेतली जात असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मुंबईत मार्च ते डिसेंबर २०२० पर्यत ८६१ करोनाबाधितांचा मृत्यू अन्य कारणांमुळे झाला आहे, तर जून २०२१ पर्यंत ही संख्या २२९९ झाली आहे.

प्रमाण किती?

२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये पुरुषांच्या मृत्यूमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर स्त्रियांच्या मृत्यूमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या मृत्यूंमध्ये २०१८ च्या तुलनेत अनुक्रमे तीन आणि एक टक्का वाढ झाल्याचे आढळले आहे.

यंदाच्या पाच महिन्यांत…

या वर्षी (२०२१) जानेवारी ते मे या काळात ४५,१६३ जणांचे मृत्यू झाल्याचे आढळले आहे. २०२० मधील एकूण मृतांच्या तुलनेत सुमारे ४० टक्के मृत्यू हे या वर्षी पाच महिन्यात झाल्याचे दिसून येते, तर या काळात ३७८० मृत्यू हे करोनामुळे झाल्याची नोंद आहे.

+++