मुंबई : वरळी येथे आलिशान मोटरगाडीने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारभूत ठरणाऱ्या आरोपी मिहीर शहाला (२३) मंगळवारी न्यालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मोटरवाहन कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी ९ जुलै रोजी नालासोपारा येथे केस कापल्याचे निष्पन्न झाले असून त्या व्यक्तीसह एकूण २७ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

वरळी अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शहा याची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे पोलिसांनी त्याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले. यावेळी सरकारी वकील भारती भोसले यांनी शहा तपासात दिशाभूल करीत असून याप्रकरण सखोल तपास करायचा असल्याचे सांगितले. त्याला बचाव पक्षाने विरोध केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर शहाला न्यायालयाने ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी शहाला विरार येथून अटक करण्यात आली होती. आरोपी महीर शहा शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. भरधाव वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यूला तो कारणीभूत ठरला होता.

kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा >>> बँकॉकहून आणलेल्या गांजासह प्रवाशाला अटक; दोन दिवसांत साडेचार कोटी रुपयांचा गांजा जप्त

गुन्हात वापरलेली मोटरगाडी विमा व प्रदुषण प्रमाणपत्राची मुदत अनुक्रमे १६ मे, २०२४ व ५ सप्टेंबर २०२३ रोजी संपल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहनावर नियमबाह्य काळ्या काचा बसवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोटर वाहन कायद्याअंतर्गत विमा नसल्यामुळे १४६, प्रदुषण प्रमाणपत्र ११५ (७) व काळ्या काचेसाठी १०० (२) अंतर्गत गुन्ह्यात कलम वाढवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> Mihir Shah : वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आरोपीचे केस कापणाऱ्याचाही जबाब नोंदवला

आरोपी मिहीर शहा मित्र आणि कुटुंबियांसोबत शहापूरमधील एका रिसोर्टमध्ये होता. कुटुंबियांना न कळवताच सोमवारी रात्री तो विरारहून पळाला. ओळख लपवण्यासाठी त्याने पेल्हार रोड, नालासोपारा येथे दाढी व केस कापले. मोहीरचे केस कापणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. आरोपीने ९ जुलै रोजी आपल्याकडून केस कापून घेतले आणि त्या बदल्यात शंभर रुपये दिल्याचे त्याने जबाबात सांगितले.

सागरी सेतू जवळ बिअरचे कॅन फेकले

मिहीरला अटक केल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. अपघातापूर्वी मिहीरने मद्य प्राशन केल्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मालाड येथील साईनाथ बारमधून घेतलेले बिअरचे चार छोटे कॅन (टीन) आरोपीने वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या प्रवेशद्वाराजवळ फेकले होते. तेही पोलिसांनी जप्त केले आहेत.