मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए व एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली. या अभ्यासक्रमासाठी गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी अधिक अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. एमबीए प्रवेशासाठी १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, १ ते ३ एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे. तर एमसीए अभ्यासक्रमासाठी ५६ हजार २५७ अर्ज आले असून, २३ मार्च रोजी परीक्षा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांसाठी अर्ज करण्याच्या तारखा अंतिम टप्प्यात आहेत. काही अभ्यासक्रमांची नोंदणी करण्याची मुदत संपली तर काही अभ्यासक्रमांची येत्या काही दिवसांत संपणार आहे. एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी करण्याची मुदत नुकतीच संपली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. यंदा एमबीए अभ्यासक्रमासाठी १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज नाेंदणी केली आहे. तर गतवर्षी एमबीएच्या ५० हजार ५०१ जागांसाठी १ लाख ५२ हजार ९११ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. एमबीएच्या तुलनेत एमसीएला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एमसीए अभ्यासक्रमासाठी गतवर्षी ३९ हजार ९६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३८ हजार ४७९ इतक्या जणांनी अर्ज शुल्क भरून निश्चित केले होते. यंदा एमसीए अभ्यासक्रमासाठी तब्बल ५६ हजार २५७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १ ते ३ एप्रिलदरम्यान, तर एमसीए अभ्यासक्रमाची परीक्षा २३ मार्च रोजी होणार आहे.

मागील पाच वर्षांत एमबीएसाठी केलेली नोंदणी

वर्ष – अर्ज – परीक्षा दिलेले

२०२५-२६ – १५७२८१ – १ ते ३ एप्रिल

२०२४-२५ – १५२९११ – १३८६८३

२०२३-२४ – १३०९२७ – ११२२०९

२०२२-२३ – १३७६३५ – १०३७४०

२०२१-२२ -१३२१९५ – १०९९९

मागील पाच एमसीएसाठी आलेले अर्ज

वर्ष- आलेले अर्ज – परीक्षा दिलेले

२०२५-२६ – ५६२५७ – २३ मार्च परीक्षा

२०२४-२५ – ३९९६५ – ३८४७९

२०२३-२४ – ३४२४६ – ३१३१९

२०२२-२३ – ३८१६२ – ३१२२१

२०२१-२२ – २५२०८ – २१३३९