मुंबई : मुंबईतील चार हजार ८२ घरांसाठी काढलेल्या सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे विविध कारणांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अखत्यारीतील मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे परत आली आहेत. ही घरे नियमाप्रमाणे प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना वितरित करणे आवश्यक होते. परंतु प्रतीक्षा यादीच शिल्लक न राहिल्यामुळे ही घरे आता रिक्त राहणार आहेत. ही घरे मुंबई मंडळाच्या पुढील सोडतीत उपलब्ध असतील.

किंमत परवडत नाही, वेळेत पैसे न भरणे, पती व पत्नीचे उत्पन्न न दाखवणे, एकापेक्षा अधिक घरे सोडतीत मिळणे यासह इतर कारणांमुळे मुंबई मंडळाकडे अडीचशेहून अधिक घरे परत आली आहेत. या घरांचे वितरण करण्यासाठी प्रतीक्षा यादी शिल्लक नसल्याची बाब लक्षात आली आहे. पूर्वीप्रमाणे शंभर टक्के प्रतीक्षा यादी असती तर ही घरे शिल्लक राहिली नसती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

हेही वाचा – मुंबई: मध्य रेल्वेवर शनिवारी, तर हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

सध्या म्हाडाने किमान एक आणि कमाल दहा टक्के प्रतीक्षा यादी निश्चित केली आहे. मध्यंतरी म्हाडाने प्रतीक्षा यादी ही पद्धतच बंद करण्याचे ठरविले होते. तसे झाले असते तर आणखी काही घरे रिक्त राहिली असती. आता म्हाडाने प्रस्ताव पाठवून पूर्वीप्रमाणेच प्रतीक्षा यादी असावी वा प्रतीक्षा यादी किती असावी, याचे अधिकार म्हाडाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर म्हाडाला पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रतीक्षा यादी ठेवता येईल. पूर्वी ही प्रतीक्षा यादी वर्षानुवर्षे कायम असायची. आता प्रतीक्षा यादीची मुदत वर्षभर असावी, असे प्रस्तावात म्हटले आहे.

२०१९ च्या सोडतीत मुंबई मंडळाने एकास पाचशे अशी प्रतीक्षा यादी तयार केली होती. त्यामुळे त्या सोडतीत फारशी घरे शिल्लक राहिली नाहीत. साधारणत: जितकी घरे तेवढीच प्रतीक्षा यादी ठेवण्याची म्हाडाची पद्धत होती. मुंबई वगळता इतर मंडळात ही यादी एकास पाचशे वा त्यांना आवश्यकता भासेल तशी ठेवण्याची मुभा त्यामुळे संबंधित मंडळांना मिळणार आहे.

हेही वाचा – व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन, ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

म्हाडाच्या सोडतीबाबत सुरेश कुमार समितीने दिलेल्या अहवालात प्रतीक्षा यादी किती असावी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादी किती असावी याचा निर्णय प्रत्येक सोडतीत किती प्रतिसाद मिळतो यावर निश्चित करता येईल. त्यामुळे गरजू व्यक्तीला घर मिळू शकेल, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.