लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

In wake of changes in laws it will be mandatory for police need to adopt new technologies
नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे मत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
footpaths in Pune city will be audited here is the reason
शहरातील पदपथांचे लेखापरिक्षण करणार? काय आहे कारण
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून मुंबई पोलीस दलाने पाच अपर पोलीस आयुक्त, २० पोलीस उप आयुक्त, ८३ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व २५ हजारांहून अधिक पोलीस अंमलदार, ०३ दंगल नियंत्रण पथके असा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे १४४ अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत चार हजारांहून अधिक गृहरक्षक दलाचे जवानांना तैनात करण्यात आले आहे. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी २६ केंद्रीय सुरक्षा दले / राज्य सुरक्षा दले यांची निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-आयुष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे पात्रता निकष शिथील

मतदान केंद्रालगतच्या १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरलेस यंत्रणा, तसेच परिसरात बॅनर, ध्वनीक्षेपक, मेगोफोनचा वापर करण्यास बंदी आहे. याशिवाय मतदान केंद्र, परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणतीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अमलबजावणी काटेकोरपणे होईल. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-सैफी रुग्णालयाबाहेरील प्रस्तावित पादचारी पुलाच्या बांधकामाला अंतरिम स्थगिती

मुंबईतून १७५ कोटींचा मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत रोख रक्कम, मूल्यवान धातू, दारू, अंमली पदार्थ इत्यादी सुमारे १७५ कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडण्याकरीता एकूण ४४९२ जणांवर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी करण्यात आले असून मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघात (मतदान केंद्र परिसर) व अन्यथा नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी मदतीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील मदत क्रमांक १००, १०३, ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Story img Loader