वरळीतील कला मेळाव्यात ५०० हून अधिक कलाकारांचा सहभाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुमारे आठ वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक आर्थिक मंदीची झळ कलेच्या क्षेत्रालाही बसली, परंतु आता हे क्षेत्र यातून सावरले असून त्याचे प्रत्यंतर वरळीत नेहरू सेंटरमध्ये भरलेल्या भव्य कला मेळ्याच्या निमित्ताने येते आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ग्रामीण भागापासून ते जगातील विविध देशांमधील सुमारे ५०० हून अधिक चित्रकार व शिल्पकार यंदा या महोत्सवात सहभागी झाले असून स्टॉलकरिता लाखो रुपयांचे भाडे भरूनही आपल्या कलेला ‘कॉर्पोरेटाश्रय’ मिळत असल्याबद्दल समाधानी आहेत.

२००८ ते २०१४ हा काळ एकूणच कलेच्या क्षेत्राकरिताही जोखमीचा काळ होता. खरेदीदार नसल्याने या काळात बऱ्याच चित्रकारांनी काम बंद करून नोकरी करण्यास सुरुवात केली होती, परंतु २०१५ पासून कलेला पुन्हा एकदा ‘कॉर्पोरेटाश्रय’ मिळू लागला आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत हे क्षेत्र पर्यायाने कलाकार पूर्णपणे स्थिरावतील, अशी अपेक्षा या महोत्सवाचे संचालक राजेंद्र पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. कॉर्पोरेट क्षेत्राला मंदीचे चटके बसल्यानंतर चित्रे आणि कलाकृतींच्या विक्रीचे व्यावसायिक गणित बदलते, हे खरे आहे.  या खरेदी-विक्रीत शक्यतो किमतीवरून घासाघीस होत नाही. त्यामुळे मंदीची झळ या क्षेत्राला अधिक जाणवते, असे निरीक्षणही नोंदविले.

कलाकारांसाठी व्यासपीठ

मुंबईतील महोत्सवाच्या सादरीकरणाचे हे सहावे पर्व आहे. ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’सारखे कला मेळावे कलाकारांना ऊर्जितावस्था देत आहेत. केवळ कलाकारांच्या कलेचे प्रदर्शन करण्याबरोबरच त्याची विक्री होऊन त्यांचे अर्थार्जन व्हावे, हा महोत्सवामागील हेतू आहे. समकालीन चित्रांना ‘कॉर्पोरेट’जगतात भरपूर मागणी असल्याने शेकडो कलाकार आपल्या सुमारे चार हजार चित्रे, छायाचित्रे, सेरीग्राफ्स, शिल्पाकृती आदी कलाकृतींसह या मेळाव्यात सहभागी आहेत. तर जगातील सहा देशांतील ४३ कलाकारांची दालने मेळाव्यात आहेत.पंढरपूर, सोलापूर या महाराष्ट्रातील ग्रामीण भागापासून ते अगदी ईशान्य भारतातील आगरतळा, आसामपासून कलाकार या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या निमित्ताने ग्रामीण भागातील दुर्लक्षित कलाकार आणि शहरी भागातील प्रस्थापित यांच्याबरोबरच नवखे कलाकार एका व्यावसायिक व्यासपीठावर येतात. येथे त्यांच्या कलाकृतींचे रसग्रहण होते आणि विक्रीही होते.

येथील स्टॉलकरिता चित्रकारांना ९० हजारांपासून ते चार लाख रुपये मोजावे लागतात, परंतु कलाकृतींना खरेदीदार मिळत असल्याने ग्रामीण भागातूनही चित्रकार हे भाडे अदा करून स्टॉल लावतात. सोलापूरचे प्रशांत यामपुरे हे गेली तीन वर्षे आपल्या चित्रांचे सादरीकरण येथे करीत आहेत. या प्रदर्शनातून अर्थार्जनाबरोबरच जनसंपर्कही वाढतो.

 — प्रशांत, कलाकार.

अंध मुलांसाठी तयार करण्यात आलेली विशेष चित्रे लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यावरून आलेल्या चिंतामणी हसबनीस यांनी अंधांकरिता ‘ब्रेल’ लिपी वापरून काही चित्र तयार केली आहेत. अंधांना चित्रे हातांनी अनुभवून त्याचा रसास्वाद घेता येईल.

– चिंतामणी हसबनीस, चित्रकार.