मुंबई : जुलैमध्ये मुंबईतील १२ हजार १३३ घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने मिळाला आहे. जूनमध्ये ११ हजार ६४३ घरे विकली गेली होती. जुलैमध्ये यात काही वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चालू वर्षात घरविक्री दरमहा १० ते १४ हजारांच्या आसपास राहिली आहे. जानेवारीत १० हजार ९६७, फेब्रुवारीत १२ हजार ५६, एप्रिलमध्ये ११ हजार ६४८, मे मध्ये १२ हजार आणि जूनमध्ये ११ हजार ६७३ घरांची विक्री झाली होती. तर २०२४ मधील सर्वाधिक घरविक्री ही मार्चमध्ये झाली होती. मार्चमध्ये १४ हजार १४९ घरांची विक्री झाली होती आणि त्यातून सर्वाधिक १ हजार १२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घरविक्रीत काहीशी वाढ झाली आहे.

हेही वाचा – मुंबई : जी.टी. वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सज्ज, अद्ययावत सोयी-सुविधा पुरवण्याचे प्रयत्न

हेही वाचा – बोरिवली रेल्वे गोळीबार प्रकरणः आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, मृताच्या नातेवाईकांची मागणी

जुलैमध्ये मुंबईतील १२ हजार १३३ घरांची विक्री झाली आहे. त्यातून राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने मिळाला आहे. पावसाळ्यात घरविक्रीत काहीशी घट दिसून येते. पावसाळा संपल्यानंतर, सणासुदीचे दिवस सुरु झाल्यानंतर घरविक्रीत वाढ होते. त्यानुसार दसरा-दिवाळी दरम्यान घरविक्रीत चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than twelve thousand house sold in july in mumbai mumbai print news ssb