नाताळ सणासाठी गोव्यामध्ये जाणाऱ्या मोठय़ा पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने २४ ते ३१ डिसेंबर या आठ दिवसांसाठी या मार्गावर वांद्रे-मडगाव-वांद्रे ही एक जादा गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी या भरधाव गाडीला जादा डबे जोडले जाणार आहेत.
नाताळनिमित्ताने गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षांनुवर्षे वाढत आहे. ते लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंगळवार २४ डिसेंबरपासून वांद्रेहून रात्री सव्वाबारा वाजता एक नाताळ विशेष गाडी सोडली जाणार आहे. ती मडगावला त्याच दिवशी दुपारी साडेबाराला पोहचणार आहे तर मडगावहून ही गाडी रात्री आठ वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.

Story img Loader