मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
1. Mumbai Marathon 2019 : हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीनू मुगाता, मीनू प्रजापती अव्वल
मुंबई मॅरेथॉनच्या 21 किलोमिटर हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू मुगाता आणि महिलांमध्ये मीनू प्रजापती यांनी बाजी मारली आहे. वाचा सविस्तर..
2. अनेक एक्स्प्रेस रद्द, मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर परळ टर्मिनसचे काम सुरू असल्याने आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नलिंग यंत्रणा, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी आज मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर..
3. न्यायालय म्हणजे ‘आप की अदालत’ नव्हे , कन्हैया कुमारचा मोदी सरकारला टोला
खासगी वृत्तवाहिनीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमाचा दाखला देत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारनं देशाचं न्यायालय म्हणजे ‘आप की अदालत’ समजू नका असा टोमणा मोदी सरकारला मारला आहे. वाचा सविस्तर..
4. वर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले!
वस्तू सेवा कर तसेच नोटाबंदीचा फायदा झाल्याचा दावा भाजप करत असला तरी सरकारी आकडेवारीनुसार २०१८ या वर्षांत एक कोटी, एक लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर..
5. मुंबई : महिला पोलिसाचा विनयभंग आणि पोलीस शिपायाला मारहाण, चौघांना अटक
वाहन थांबवून तपासणी केल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर अन्य सहकाऱ्यांसोबत येऊन इब्राहिम शेख याने भररस्त्यात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मेश्राम यांना शिवीगाळी करीत त्यांच्यासोबत असलेल्या महिला शिपायाचा विनयभंग करून पोबारा केला होता. वाचा सविस्तर..