शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारीच्या दिवशी हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. आता मॉरिस नोरोन्हानाची एक पोस्ट चर्चेत आहे. X अकाऊंट वर केलेली ती पोस्ट आणि हत्येचं कनेक्शन आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा गुरूवारी संध्याकाळी (८ फेब्रुवारी) एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तुल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

हे पण वाचा- अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यापूर्वी मॉरिसचे शब्द होते, “आज बहुत लोग..”

मॉरिस नोरोन्हा हा दहिसर-बोरिवली परिसरात राहायचा. या भागात तो मॉरिस भाई म्हणून परिचीत होता. तो अनेकवेळा परदेश दौरेही करत होता. नुकतंच तो अमेरिकेतील लॉस एंजल्सवरून आला होता. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्याने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ज्या भागाचं नेतृत्व अभिषेक घोसाळकर करतात, त्याच भागातून मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. मात्र घोसाळकर त्याला विरोधक ठरत होते. आता याच मॉरिसची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यावरुन त्याने हत्या करायची हे आधीच ठरवलं होतं का? याची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

काय आहे मॉरिसची एक्स पोस्ट?

‘You can’t defeat a man, who doesn’t care about pain, loss, disrespect, Heart Break and rejection’. मॉरिस नोरान्हानं २९ जानेवारीला केलेली ही पोस्ट. ही पोस्ट त्याने अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यापूर्वी १० दिवस आधी केली होती.

८ फेब्रुवारीला मॉरिसने जे काही कृत्य केलं त्याचा इशाराच जणू त्याने या पोस्टमधून दिला होता का? याची चर्चा होते आहे. कारण जेव्हा त्यांनं अभिषेक घोसाळकरवर गोळ्या झाडल्या, त्याच्या काही मिनिटं आधी फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकरांच्याच बाजूला बसून त्यानं एक डायलॉग मारला होता. तो म्हणाला होता आज बहुत सारे लोग सरप्राईज होंगे. या डायलॉगनंतर पुढच्या पाच ते सात मिनिटात त्याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या चालवल्या आणि त्यानंतर आत्महत्या केली.