मधु कांबळे

मुंबई : राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांना आता जुन्या निवृत्तिवेतन योजनेतील कुटुंब निवृत्तिवेतन, रुग्णता निवृत्तिवेतन, तसेच १४ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत उपदान (ग्रॅच्युईटी) इत्यादी लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला कुटुंब निवृत्तिवेतन मिळणार आहे, त्यामुळे नव्या योजनेतील दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे.विशेष म्हणजे १ नोव्हेंबर २००५ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तिवेतन योजनेतील हे लाभ मिळणार आहेत. जुन्या योजनेतील बहुतांश लाभ नव्या योजनेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहेत. आता फक्त जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याबाबत राज्य शासनाने समिती गठित केली आहे. समितीच्या अहवालानंतर त्यावर निर्णय होईल, असे वित्त विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात यावी, ही मागणी धसास लावण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच कर्मचारी संघटनांनी संप पुकारला होता. त्याबाबत शिफारशी करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली.त्यानंतर लगेचच सेवेत असताना एखाद्या अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या वारसाला जुन्या योजनेनुसार कुटंबु निवृत्तिवेतन देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. राज्य शासनाने आता कुटुंब निवृत्तिवेतनाबरोबरच परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना किंवा रा्ष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेतील आणखी काही लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. सेवेत असताना वैद्यकीय कारणास्तव निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन तसेच सेवा उपदान मिळणार आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या १४ लाख रुपये मर्यादेपर्यंत उपदानाची रक्कम दिली जाणार आहे.

नवीन निवृत्तिवेतन योजनेत कुटुंब निवृत्तिवेतनाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जात होते. परंतु आता कुटुंब निवृत्तिवेतन दिले जाणार असल्याने सानुग्रह अनुदान यापुढे दिले जाणार नाही. किंबहुना त्यासाठीचे अर्ज स्वीकारू नयेत व प्रलंबित प्रकरणे बंद करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लाभ कुणाला?

जुन्या निवृत्तिवेतन योजनेतील कुटुंब निवृत्तिवेतन, रुग्णता वेतन व उपदान हे लाभ राज्य शासकीय कर्मचारी तसेच, जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक, माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी सलग्न अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहेत.