लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : टाटा रुग्णालयामध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने अधिकाधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी टाटा रुग्णालयाने त्यांच्या खारघर येथील ॲक्ट्रॅक रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी विशेष विभाग सुरू केला. या विभागाने अवघ्या ५९ दिवसांमध्ये ५१ शस्त्रक्रिया करत कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा मान मिळवला आहे.

After cochlear implant surgery included in Mahatma Phule Jan Arogya Yojana Nagpur saw first surgery
महात्मा फुले योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरात… दोन वर्षीय चिमुकला…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल
pune bhaubeej marathi news
पुणे: भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीला जीवदान, अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
NMC, safety doctors, medical colleges, doctors,
धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पोटातून डॉक्टरांनी काढल्या तब्बल ६५ वस्तू; शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, पोटात आढळलं…
all party leaders meet mahesh patil in hospital after bitten by snake
साप चावलेल्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांची सर्व पक्षीय नेत्यांकडून विचारपूस

दरवर्षी, टाटा रुग्णालयात सुमारे ५० ते ६० हजार रुग्णांची नोंदणी होते. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम अहवाल २०२० मध्ये दिलेल्या अंदाजानुसार २०२० च्या तुलनेत २०२५ मध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत १२.८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, कर्करोगाचे लवकर निदान करून त्यावर रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे, केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि टाटा मेमोरियल केंद्राने त्यांच्या खारघर येथील ॲक्ट्रॅकमधील सेवासुविधांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ॲक्ट्रॅकमध्ये १३ शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले. यामध्ये रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करता याव्यात यासाठी विशेष विभाग तयार केला गेला. यामध्ये जागतिक स्तरावर असलेल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा-राज्यात ‘पॅलिएटिव्ह केअर’ सेवेच्या विस्ताराची गरज!

रोबोटच्या सहाय्याने जलद, सहज व विनात्रास शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांकडून रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याबाबत मागणी होत आहे. रुग्णांच्या मागणीमुळेच ॲक्ट्रॅकमध्ये अवघ्या ५९ दिवसांमध्ये ५१ रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सर्वात कमी कालावधीत रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे ॲक्ट्रॅक हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे, अशी माहिती ॲक्ट्रॅकचे संचालक व प्रख्यात कर्करोग शल्यविशारद डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.

प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सकांना अधिक अचूकतेने शस्त्रक्रिया करण्यास मदत होत आहे. तसेच, रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करताना लहान चीरांमुळे पेशींचे कमी नुकसान होत असल्याने रुग्णही लवकर बरे होतात. शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना, रक्त कमी होणे आणि रुग्णालयात कमी वास्तव्य, यामुळे अनेक रुग्ण पारंपरिक पद्धतींपेक्षा रोबोटिक सहाय्याने करणाऱ्या शस्त्रक्रियांना प्राधान्य देत असल्याचे ॲक्ट्रॅकमधील प्राध्यापक डॉ. सुधीर नायर यांनी सांगितले.

आणखी वाचा-ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत

ॲक्ट्रॅकमधील ५०० खाटांपैकी १३० खाटा या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात येत असल्यामुळे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी असलेली प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. डोके आणि मान, आतड्यांसंबंधी, मूत्रविज्ञान, स्त्रीरोग इत्यादीसाठी रुग्णांना चांगले उपचार मिळण्यास मदत होत असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.