मुंबई : विद्याविहार पूर्वेला असलेल्या चित्तरंजन कॉलनीत रविवारी सकाळी एक दुमजली बंगला आठ ते दहा फूट खाली खचला होता. रात्री उशिरा हा बंगला जमीनदोस्त करून तेथे अडकलेली वृद्ध महिला व तिच्या मुलाला २० तासानंतर बाहेर काढण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्याविहार येथील राजावाडी रुग्णालय परिसरात असलेल्या चित्तरंजन कॉलनीत रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एक बंगला सात ते आठ फूट खचला होता. स्थानिकांनी तत्काळ त्याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर टिळकनगर पोलिसांसह अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पालिका अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चारजणांना तत्काळ बाहेर काढले. 

हेही वाचा >>> गिरणी कामगारांसाठीच्या २०२० च्या सोडतीतील उर्वरित विजेत्यांना १५ ऑगस्टपर्यंत घरांचा ताबा

मात्र यामध्ये नरेश पालांडे (वय ५६) आणि त्यांची आई अलका पलांडे (वय ९४) तळमजल्यावर अडकले होते. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र बंगला एका बाजूला पूर्णपणे खचल्याने काम जिकिरीचे होते. रात्री उशीरा हा बंगला जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रात्री बंगला जमीनदोस्त करून दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother and daughter died in the vidyavihar colony bunglow collapsed mumbai print news ysh
Show comments