राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या नवी दिल्ली येथील ‘मदर डेअरी’ ब्रँडच्या दुधाचे उत्पादन मुंबईतही सुरू होणार असून भिवंडी येथे सुमारे १० हजार लिटरचा प्रकल्प उभारला जाणार आहे. शासकीय दुग्धशाळेची जागा तेथे देण्यात आली आहे, असे दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले. वरळी शासकीय दुग्धशाळेत काम करणाऱ्या शेकडो अतिरिक्त कर्मचाऱ्यांना आता फुकट पगार दिला जाणार नसून राज्य सरकारच्या अन्य खात्यांमध्ये त्यांना पाठविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भिवंडीजवळ राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाला जागा देऊन मोठय़ा प्रमाणावर दुग्धप्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाईल. कणकवली येथेही शासकीय दुग्धशाळा ‘गोकुळ’ कडे हस्तांतरित केली जाणार आहे. सध्या तेथे दूध संकलनाचे काम गोकुळकडेच देण्यात आले आहे.
वरळी येथील शासकीय दुग्धशाळेत सुमारे ७०० कर्मचारी असून बहुतांश लोकांना काहीच काम शिल्लक नाही. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यांना अन्य विभागांमध्ये पाठविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा