ठाणे-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली असून मृतांमध्ये एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा समावेश आहे. फरिन अफजल खान (२५), असे महिलेचे तर आलीया (६) आणि फरान (३), अशी मुलांची नावे आहेत. कान दुखत असल्याने दवाखान्यात जाऊन येते, असे पतीला सांगून फरीन दोन मुलांसोबत घराबाहेर पडली होती. ठाणे- दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने फरीन आणि तिच्या मुलांना धडक दिली. त्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.