मातेने आपल्या तीन मुलांना उसाचा रस पाजल्यानंतर तिघांचीही प्रकृती बिघडल्याची घटना जुहू येथे गुरुवारी रात्री घडली. मुलांच्या वडिलांनी मातेने मुलांवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला असून डी. एन. नगर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मुलांच्या पोटात रसातून कोणते घटक केले याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तीनही मुलांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जुहू गल्ली येथील हुसैन चाळीत मोहम्मद फारुक शेख (३५) आपल्या तीन मुलांसह राहतात. त्यांनी घटस्फोटित पत्नी शाहिनने मुलांवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे.

Story img Loader