मुंबईः उभयतांमध्ये झालेल्या वादानंतर आईने मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार वांद्रे पूर्व येथे घडला. मुलीच्या प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून मुलगी हाताला चावल्यामुळे संतापलेल्या आईने मुलीची हत्या केली. त्यानंतर तिला मिरगी आल्याचा बनाव केला. पण वैद्यकीय तपासणीत मुलीचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

भूमिका बागडे (१९) असे मृत मुलीचे नाव असून ती वांद्रे पूर्व येथे आई टिना (४०) सोबत राहत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे प्रेमसंबंधांवरून आईसोबत भांडण झाले. प्रेमसंबंध आईला मान्य नसल्यामुळे मुलगी संतापली व तिने आईच्या हाताचा चावा घेतला. त्यात महिलेच्या तर्जनीला गंभीर इजा झाली. त्यामुळे संतापलेल्या आईने मुलीचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकारामुळे घाबरलेल्या आईने मुलीला मिरगी आल्याचा बनाव करून तिला डीएन देसाई रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी भूमिकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

हेही वाचा – मुंबई : सागरी किनारा मार्गाची दक्षिण बाजू आजपासून खुली होणार; परंतु, ‘या’ वाहनांना प्रवेशबंदी

हेही वाचा – धारावीत १८ मार्चपासून सर्वेक्षणाला सुरुवात

तपासणीत मुलीच्या गळावरील व्रण व आईच्या हाताला झालेली जखम यावरून संशय आल्यामुळे वैद्यकीय तपासणी केली असता मुलीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल करून हत्या व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.