माहीम येथे बुधवारी पहाटे मोटारसायकल एका गाडीला धडकून झालेल्या अपघातात कुंदन हळदे (१८) या तरुणाचे निधन झाले तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.  
माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरोळ येथील काही तरुण प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी निघाले होते. काहीजण मोटारसायकवर तर काही जण चालत होते. माहीम बस आगाराजवळ चहा पिण्यासाठी हे थांबले असताना हा दुर्देवी प्रकार घडला.
पल्सर मोटारसायकल (क्रमांक-एम.एच.०२ सीवाय ७३५१) एका गाडीला धडकली. या जोरदार धडकेत मोटारसायकलच्या पुढील भागाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास त्याचे निधन झाले. संदीप गोरे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader