मुंबई : युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या औद्योगिकदृष्टय़ा अतिप्रगत राज्याशी राज्य सरकारने रविवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला.या उपक्रमासाठी राज्य सरकारने शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी, उद्योग व कामगार आणि कौशल्यविकास व उद्योजकता या विभागांचे मंत्री आणि सचिवांचा कृतीगट स्थापन केला आहे. केंद्र सरकारने ना हरकत प्रदान केल्यावर बाडेन वुटेनबर्ग राज्याचा मंत्री गट व महाराष्ट्र राज्याचा मंत्री गट यांच्या औपचारिक चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in