लातूरमध्ये रेल्वे आणि मेट्रो ट्रेनसाठी लागणाऱ्या डब्यांची निर्मिती होईल अशी घोषणा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला आनंदाची बातमीच दिली आहे. या घोषणेमुळे ५० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. रेल्वे, राज्य सरकारचा एमआयडीसी विभाग यांच्यात ६०० कोटींचा करार झाला आहे. लातूरमधील कोच बांधणी प्रकल्पामुळे ५० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. लातूर सोबतच बीड आणि परभणी या शहरांमध्येही रेल्वे आणि मेट्रो कोच निर्मितीसाठी वेंडर्सची इको सिस्टिम उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मॅग्नेटिक महाराष्ट्र हा मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी देणारा उपक्रम ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in